|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रोशनी तीर्थहळ्ळी ठरली राज्यात दुसरी

रोशनी तीर्थहळ्ळी ठरली राज्यात दुसरी 

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव जिल्हय़ात दहावी परीक्षेत प्रथम येण्याचा मान मिळविलेल्या रोशनी तेजस्वी तीर्थहळ्ळी हिने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. 622 गुण मिळवत ती राज्यात चौथी आली होती. मात्र अधिक गुण मिळणार असल्याच्या विश्वासाने पुनर्मूल्यांकनासाठी तिने अर्ज केला होता. त्यानुसार रोशनीचे दोन गुण वाढले असून 625 पैकी 624 गुण घेत ती राज्यात दुसरी आली आहे.

रोशनी डिव्हाईन प्रेव्हिडन्स हायस्कूलची विद्यार्थिनी असून तिने राज्यात शाळेचे व बेळगावचे नाव उंचावले आहे. सातत्यपूर्ण अभ्यास व विश्वासाच्या जोरावर हे यश मिळविले आहे. पूनर्मूल्यांकनात कन्नड व विज्ञान विषयात अनुक्रमे एक-एक गुणांची वाढ झाली आहे. यामुळे राज्यात चौथ्या क्रमांकावरून तिने दुसऱया क्रमांकावर झेप घेतली आहे.

रोशनी हिने बोलताना या यशाची आपल्याला खात्री होती. यामुळेच पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेतला होता, असे सांगत खूप आनंदी असल्याचे मत व्यक्त केले. या यशामध्ये प्राचार्याचे मार्गदर्शन व आई-वडिलांचे प्रोत्साहन होते, असे सांगितले.

या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या मेरी अब्राहम यांनी तिचे अभिनंदन केले. शिवाय शाळेबरोबर जिल्हय़ाचे नाव उंचावले असून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रोशनी ‘आदर्श’ आहे असे सांगत तिचे कौतुक केले. रोशनी ही डॉ. तेजस्वी यांची कन्या तर निवृत्त सर्जन डॉ. एल. श्रीनिवास यांची नात आहे.  

Related posts: