|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई सुरुच

विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई सुरुच 

प्रतिनिधी/ बेळगाव

शहर व उपनगरात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाईचा सपाटा सुरुच ठेवला आहे. शुक्रवारी दिवसभरात 384 दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी शुक्रवारी रात्री एक पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून हेल्मेटची सक्मती करण्यात येत असून अपघातात डोक्मयाला जबर दुखापत होऊन मृत्यूमुखी पडणाऱयांची संख्या घटविण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

शुक्रवारी 384 दुचाकीस्वारांना अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली असून 38 हजार 400 रुपये दंड वसूल केला आहे. अपघातातील मृत्यूंचे प्रमाण घटविण्यासाठी दुचाकी चालविताना प्रत्येकाने हेल्मेट परिधान करणे सक्तीचे असून या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.