|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निवडणूक संपताच पेट्रोल- डिझेलची दरवाढ

निवडणूक संपताच पेट्रोल- डिझेलची दरवाढ 

बेळगाव  / प्रतिनिधी

निवडणुकांची रणधुमाळी संपताच पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीला सुरुवात झाली आहे. निवडणुका होताच दरवाढ होण्याची शक्मयता वर्तविण्यात येत होती. त्याप्रमाणे दरवाढीला प्रारंभ झाला आहे. पहिल्याच दिवशी अंदाजे 20 पैशांनी पेट्रोल तर 16 पैशांनी डिझेलच्या दरात वाढ झाली. ही वाढ अशीच वाढत राहिल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

निवडणुकांचे वारे संपताच महागाईला सुरुवात होणार हे निश्चितच होते. निवडणुकांमध्ये महागाई नियंत्रणात आणण्याचे आश्वासन प्रत्येक राजकीय पक्ष देत असला तरी प्रत्यक्षात मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱया घडामोडींवर दरवाढ अवलंबून असते. मागील अनेक दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे दरवाढ होणार होती. परंतु देशात लोकसभा निवडणुकीच्या कार्यकाळात ही दरवाढ करता येत नसल्याने ती थांबविण्यात आली होती.

गुरुवारी दुपारनंतर निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होताच रात्री उशीरा पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे असणारे तेल तसेच त्याची वाहतूक या सर्वांचा परिणाम या दरवाढीमागे असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी 73.71 रुपये असणारे पेट्रोल शुक्रवारी 73.85 रुपयांवर आले. तर 68.60 रुपये असणारे डिझेल 68.76 रुपयांवर येऊन पोहोचले. ही दरवाढ काही पैशांची असली तरी ती अशीच राहिल्यास 5 ते 7 रुपयांनी वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दर आणखीन भडकण्याची शक्मयता

निवडणुकांचे वारे थांबताच पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. ही दरवाढ यापुढेही वाढत राहिल, असा अंदाज विश्लेषकांकडून मांडण्यात येत आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेल दरात काही पैशांनी वाढ होत असली तरी येत्या काही दिवसांत ती आणखीन भडकण्याची शक्मयता त्यांनी व्यक्त केली.

प्रशांत मेलगे (सदस्य बेळगाव पेट्रोल डिलर्स असोसिएशन)