|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

बुध. दि. 26 मे 1 जून 2019

मेष

मिथुनेत बुध प्रवेश, शुक्र, नेपच्यून लाभयोग होत आहे. तुमच्या धंद्यात चांगली संधी मिळण्याची आशा निर्माण होईल. उतावळेपणा नको. जिद्द व प्रयत्न करा. थकबाकी मिळवा. राजकीय- सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. नवीन ओळखी वाढतील. गुप्त कारवाया, कोर्टकेस यामध्ये मंगळवार, बुधवार सावध रहा. कला, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. नोकरीतील वरि÷ तुमच्या नावाची शिफारस करतील.


वृषभ

वृषभेच्या धनस्थानात बुध प्रवेश, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. शुक्रवार, शनिवार घरात नाराजी होईल. किरकोळ समस्या येईल. वाद वाढवू नका. धंद्यात काम मिळेल. मैत्री तोडू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव वाढेल. पदाधिकार मिळेल. कायदा मात्र मोडू नका. कला, क्रीडा क्षेत्रात ओळखी होतील. प्रगतीची संधी मिळेल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. कोर्टकेस सप्ताहाच्या सुरुवातीला जिंकाल.


मिथुन

तुमच्याच राशीत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. अतिरेक कोणत्याही वागण्याचा, बोलण्याचा कुठेही करू नका. प्रति÷ा सांभाळा. धंद्यात कष्ट घ्यावे लागतील. संधी मिळेल. पदासाठी वाट पहावी लागेल. घरात सुखद वातावरण राहील. जीवनसाथी मुळे यांची प्रगती होईल.  शेअर्सचा अंदाज बरोबर येऊ शकतो. जोखीम पत्करू नका. कोर्टकेस कठीण असेल.


कर्क

कर्केच्या व्यवस्थानात बुध प्रवेश, सूर्य,चंद्र लाभयोग होत आहे. रविवार, सोमवार वाहन जपून चालवा. दुखापत, दगा फटका होऊ शकतो. गुप्त शत्रू कारवाया करतील. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा राहील. रागावर नियंत्रण ठेवा. धंद्यात काम लवकर मिळवा. क्षुल्लक कारणाने नाते, व्यवहार तोडू नका. कला, क्रीडा क्षेsत्रात प्रसिद्धी मिळेल. कोर्टाच्या कामात बुधवारपासून यश मिळेल. घरातील माणसे मदत करतील.


सिंह

मिथुन राशीत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. मंगळवार, बुधवारी धावपळ होईल. चर्चेत वाद होऊ शकतो. धंदा वाढेल. जमिनीचे काम करून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव राहील. लोकप्रियता मिळेल. घरातील वाद मिटवा. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्टाच्या कामात यश खेचता येईल. नवीन परिचयामुळे तुमचा उत्साह वाढेल. नोकरीत चांगला बदल करता येईल.


कन्या

मिथुन राशीत बुध प्रवेश करीत आहे. सूर्य, चंद्र लाभयोगात होत आहे. या सप्ताहात तुमच्या कामात अडचणी येतील. धंदा मिळेल. गिऱहाईकाशी भांडण करू नका. हिशोब नीट करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची मदत मागितली जाईल. वाटाघाटीत यश कमी पडेल. कला, क्रीडा क्षेत्रात नाव होईल. कोर्टाच्या कामात वाकडय़ा वाटेने यश मिळणार नाही. घरात जबाबदारी वाढेल. स्वत:ची काळजी घ्या.


तुळ

मिथुन राशीत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. धंदा मिळवतांना सौम्य धोरण ठेवा. बुधवार, गुरुवार तुमच्याशी स्पर्धा करणारे लोक काडय़ा घालतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या विरोधात डाव टाकण्याचा प्रयत्न होईल. कला, क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. जिंकणे सोपे नाही. कोर्टकेसमध्ये योग्य मार्गदर्शन घ्या. मगच बोला.


वृश्चिक

मिथुनेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. तुमच्याबद्दल  लोकांच्या मनात गैरसमज निर्माण केला जाईल. धंद्यात सावध रहा. सौम्य धोरण ठेवा. कंत्राट घेतांना स्पष्टपणे बोलून नीट खुलासा करून घ्या. संसारात तणाव होईल. तुमचे विचार इतरांना पटणे  कठीण. स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्टकेस जिंकता येईल.


धनु

मिथुन राशीत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. या सप्ताहात तुमचा आत्मविश्वास टिकून राहील. संयम मात्र सोडू नका. राग आवरा, धंद्यात काम मिळवताना वाद होऊ शकतो. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर आरोप येईल. वाटाघाटीत जे मिळेल ते घ्यावे लागेल. घरातील माणसांचा आधार मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात परिक्षा कठीण असेल. कोर्टकेसमध्ये मुद्दे पाहून घ्या.


मकर

मिथुन राशीत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात सप्ताहाच्या सुरुवातीलाच कामे होतील. चर्चा करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व राहिल. वाटाघाटीत क्षुल्लक तणाव होईल. विरोधकांना कसे गप्प करावयाचे ते आताच ठरवा. कायद्याच्या बाबतीत लवकर प्रश्न सोडवा. कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. संसारात कामे वाढतील.


कुंभ

मिथुनेत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. प्रत्येक दिवस तुम्ही योग्य पद्धतीने वागून यश मिळवू शकाल. मनोबळ राहील. कोणतेही वक्तव्य करताना सावध रहा. नोकरीत वरि÷ अडवणूक करण्याचा प्रयत्न करतील. धंदा मिळेल. थकबाकी वसूल. करा. राजकीय, सामाजिक कार्यात किरकोळ तणाव होईल. तुमच्याबरोबर मतभेद होईल. कोर्टाच्या कामात सावध रहा.


मीन

मिथुनेत बुध प्रवेश, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. रविवार, सोमवारी मन अस्थिर होईल. डोके शांत  ठेवा. धंद्यात नवे काम मिळेल. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक कार्यात नवीन मोठय़ा लोकांचा परिचय होईल. पदाधिकार मिळेल. वाटाघाटीत फायदा होईल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. पुरस्कार मिळेल. कोर्टकेस संपवता येईल.