|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुडाळदेशकर, सारस्वत समाजाचा आज मेळावा

कुडाळदेशकर, सारस्वत समाजाचा आज मेळावा 

प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:

कुडाळदेशस्थ आद्य-गौड ब्राह्मण युवक मंडळातर्फे रविवारी 26 मे रोजी सकाळी 9.30 वाजता कुडाळ येथील वासुदेवानंद मंगल कार्यालयात समस्त कुडाळदेशकर आणि सारस्वत जाती आणि पोटजातींचा जागृती व वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या जागृती मेळाव्यानिमित्त ज्ञातीतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या ज्ञाती बांधवांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच ज्ञातीतील हौशी कलाकारांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी व्यावसायिक ज्ञातीबांधवांचे विविध उत्पादनाचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. समाजातील सामान्यातील सामान्य माणसापर्यंत पोहोचून आपला समाज एकसंघपणे आणि मजबूतपणे बांधला जावा, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ येथील शैलजा शेखर सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून ज्ञाती बांधवांनी मोठय़ा संख्येने या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुडाळदेशस्थ आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळाचे अध्यक्ष योगेश सामंत व सचिव विशाखा नाईक यांनी केले आहे.