|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » खासदार विनायक राऊत यांना मंत्रीपद मिळावे

खासदार विनायक राऊत यांना मंत्रीपद मिळावे 

दीपक केसरकर यांची अपेक्षा

वार्ताहर / सावंतवाडी:

खासदार विनायक राऊत यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यावे, अशी आमची मागणी आहे. राऊत यांनी या जिल्हय़ातील दादागिरी पहिल्यावेळच्या विजयाने मोडीत काढली होती. आताच्या विजयामुळे विकासाचे नवे पर्व येणार आहे. त्यांना मंत्रीपद देण्यात यावे, अशी अपेक्षा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, आम्ही जे सांगतो ते करून दाखवतो. आतापर्यंत आम्ही जे सांगितले ते केले आहे. आम्ही पाच वर्षात विकास करून दाखविला. त्यामुळेच जनता आमच्या पाठीशी राहिली. या जिल्हय़ात यापूर्वी दहशत होती. ती पाच वर्षापूर्वी खासदार राऊत निवडून येताच दूर झाली. राऊत यांना मंत्रीपद देण्याची मागणी आम्ही करणार आहोत. जिल्हय़ात मच्छीमार, शेतकऱयांचे प्रश्न सोडविण्यासाठी गावागावात दौरे करणार आहोत. आमदार वैभव नाईक यांना सोबत घेऊन जिल्हा संपर्क दौरा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.