‘बिग बॉस’मध्ये अभिजीत केळकर, किशोरी शहाणे

‘बिग बॉस मराठी 2’ रविवारपासून सुरुवात झाली. या पर्वात स्पर्धक कोण असणार याची उत्कंठा सगळय़ांनाच होती. अखेर शनिवारी 15 स्पर्धकांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मराठी चित्रपट सृष्टीतील दोन नावे आघाडीवर आहेत. ती म्हणजे अभिजीत केळकर आणि किशोरी शहाणे-विज.
मागील वर्षी बिग बॉस मराठीचे पहिले पर्वाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. यंदाही दुसऱया पर्वात कोण स्पर्धक असतील याबाबत उत्सुकता होती. बिग बॉसच्या घरात अभिजीत आणि किशोरी यांच्या व्यतिरिक्त नेहा शितोळे, शिव ठाकरे, शिवानी सुर्वे, वैशाली म्हाडे, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, वीणा जगताप, नाटय़कर्मी दिगंबर नाईक, विद्याधर जोशी, रुपाली भोसले, मैथिली जावकर, माधव देवचके, अभिजीत आवाडे-बिचुकले, पराग कान्हेरे यांचा सहभाग आहे.
Related posts:
Posted in: मनोरंजन