|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘सत्यशोधक’मध्ये संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडे एकत्र

‘सत्यशोधक’मध्ये संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडे एकत्र 

कसदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे आता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. फुले दांपत्यावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट या वर्षअखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

अलीकडेच राजश्री देशपांडेची प्रमुख भूमिका असलेली ‘सेक्रेड गेम्स’ आणि संदीप कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेली ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ या वेबसीरिज गाजल्या आहेत. या दोघांच्याही अभिनयाचे कौतुक झाल्यानंतर आता पहिल्यांदाच हे दोन्ही कसलेले कलाकार एकत्र आले आहेत. ‘सत्यशोधक’ या चित्रपटाची निर्मिती समता प्रॉडक्शन आणि कथाकार एंटरटेन्मेंटने केली असून निलेश जळमकर चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक आहेत. ‘सत्यशोधक’ चित्रपटाविषयी संदीप कुलकर्णी म्हणाले की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याचे विचार काळापुढचे होते. तसेच त्यांचे नातेही काळाच्या पुढेच होते. त्यांच्यातल्या नात्याचा वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात येईल. त्यामुळे या दांपत्याचे पुरोगामी विचार, त्यांचे कार्य, त्यांचे नातं यावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटाचे 50 टक्के चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या वर्षाअखेरीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.