|Thursday, February 20, 2020
You are here: Home » मनोरंजन » ‘विठुमाऊली’ मालिकेचे 500 भाग पूर्ण

‘विठुमाऊली’ मालिकेचे 500 भाग पूर्ण 

स्टार प्रवाह’ वरील ‘विठुमाऊली’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. याच प्रेमापोटी या मालिकेचे नुकतेच 500 भाग पूर्ण झाले. या खास प्रसंगी मालिकेची संपूर्ण टीम आणि निर्माते महेश कोठारे, आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्या उपस्थितीत सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले. ‘विठुमाऊली’ मालिकेचा 500 भागांचा हा प्रवास रोमांचक होताच यापुढचा प्रवास आणखी उत्कंठावर्धक होईल.

‘विठुमाऊली’ मालिकेत सध्या विठुरायाच्या मंदिराच्या उभारणीचा नयनरम्य प्रवास पाहायला मिळतोय. विठ्ठलाचा लाडका भक्त पुंडलिकाने हे पवित्र काम हाती घेतलेय. पुंडलिकाच्या या प्रवासात बरेच अडथळेही आहेत. पुंडलिकाचे मंदिर उभारण्याचे हे कार्य पूर्ण होऊ नये म्हणून कलीचेही प्रयत्न सुरू आहेत. या अडथळय़ांवर मात करत पुंडलिक मंदिराची उभारणी कशी करणार? याचा रंजक प्रवास ‘विठुमाऊली’च्या यापुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

रोहन नाईक, मुंबई

Related posts: