|Sunday, August 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पद्म पुरस्कारप्राप्त महिलेचा व्हिसा अर्ज रद्द

पद्म पुरस्कारप्राप्त महिलेचा व्हिसा अर्ज रद्द 

भारतात राहून मागील 25 वर्षांपासून गोसेवा करणारी जर्मन नागरिक प्रेडरिके इरीना ब्रूनिंग यांचा व्हिसा कालावधी वाढविण्यास विदेश मंत्रालयाने नकार दिला आहे. प्रेडरिके यांना यंदाच पद्मश्रीने गौरविण्यात आले होते.
व्हिसा कालावधी वाढविण्यास नकार देण्यात आल्यावर त्यांनी समाजमाध्यमांवर पुरस्कार परत करण्याचा प्रस्ताव मांडला होता. याप्रकरणी विदेश मंत्री स्वराज यांनी स्वतःच्या विभागाकडून अहवाल मागविला आहे.