|Sunday, August 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » समुद्रमार्गे दहशतवादी घुसण्याची शक्यता

समुद्रमार्गे दहशतवादी घुसण्याची शक्यता 

केरळमध्ये अतिदक्षता : ‘आयएस’चे दहशतवादी हल्ल्याच्या पवित्र्यात

तिरुवअनंतपुरम / वृत्तसंस्था

‘आयएस’ संघटनेचे काही दहशतवादी केरळमध्ये घुसण्याची शक्यता गुप्तचर विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. समुद्रमार्गे काही दहशतवादी राज्यात घुसखोरी करतील असा इशारा देण्यात आल्यानंतर केरळ किनारपट्टीवर हायअलर्ट जारी करण्यात आला. तसेच हल्ल्याच्या शक्यतेने भारताच्या अन्य किनारपट्टींची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मच्छीमारांनाही दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दहशतवाद्यांनी आणखी एक मोठा कट रचल्याची शक्मयता वर्तवण्यात येत आहे. श्रीलंकेच्या अधिकाऱयांनी आयएसचे 15 दहशतवादी लक्षद्वीपमार्गे भारतात प्रवेश करण्याची शक्मयता वर्तवली आहे. श्रीलंकेच्या वरि÷ अधिकाऱयांनी 23 मे रोजी एक अलर्ट जारी केला आहे. आयएसचे 15 दहशतवादी बोटीतून लक्षद्वीपच्या दिशेने जात असल्याची माहिती यामध्ये देण्यात आली. तसेच या दहशतवाद्यांनी मोठा कट रटल्याचेही यामध्ये सांगण्यात आले. या इशाऱयानंतर गुप्तचर यंत्रणेने त्वरित पावले उचलत केरळ पोलीस आणि तटरक्षक दलाला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले.

15 दहशतवादी घुसण्याचा धोका

समुद्रमार्गे भारतात तब्बल 15 दहशतवादी घुसण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोणत्याही देश किंवा गुप्तचर यंत्रणेकडून प्रथमच घुसखोर दहशतवाद्यांची संख्या जाहीर करून इशारा देण्यात आला आहे. त्यामुळेच हय़ावेळी अधिक सतर्कता बाळगली जात आहे. तातडीने केरळ किनारपट्टीची सुरक्षा वाढवण्यात आली. तसेच अन्य किनारपट्टी भागातही तटरक्षक दलाला सतर्क करण्यात आले. 

 श्रीलंकेत ‘ईस्टर संडे’ला 21 एप्रिल रोजी साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. यामध्ये 250 पेक्षा अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. आयएसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्या हल्ल्यानंतर भारतातही दक्षता बाळगली जात आहे.