|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गरजूंच्या झोळीत मुस्लिम बांधवाचे बहुमोल दान

गरजूंच्या झोळीत मुस्लिम बांधवाचे बहुमोल दान 

संग्राम काटकर/ कोल्हापूर

पवित्र रमजान महिन्यामध्ये जकात, सदका आणि फितरा या तीन वचनांचे पाईक बनून गहू, कपडे, जीवनाश्यक वस्तु, गृहपयोगी साहित्य आदी वस्तूं गरजूंना दान केल्या जातात. प्रेषित महंमद पैगंबरांनी रमजानमध्ये दानधर्म करणे ही मुस्लिम बांधवांना जणू सक्तीच केली आहे. दान देताना गरजूंलाच निवडणे, मग तो कोणत्याही जाती-धर्मातील असो असा माणुसकीचा संदेशही दिला आहे. या संदेशाची जाणिव ठेवत समस्त मुस्लिम बांधव सध्या सुरु असलेल्या रमजान महिन्यामध्ये जकात, सदका आणि फितरा या वचनांची पुर्तता करण्यासाठी मुक्त हस्ते दानधर्म करताना दिसत आहेत. वचनांची पुर्तता करतानाच मशिदींमध्ये पाच वेळेचे नमाज पठणही करत आहेत. नमाजनंतर कुणाला औषधासाठी, कुणाला रोजगारासाठी, कुणाला शिक्षणासाठी तर कुणाला घरसंसारासाठी दहा रुपयांपासून ते पाचशे-हजार रुपयांपर्यंतची मदत केली जात आहे.

   प्रेषित महंमद पैगंबर यांनी मुस्लिम बांधवांकडून सामाजिक भान जपले जावे यासाठी पवित्र कुराण शरीफमध्ये जकात, सदका, फितरा या वचनांची मांडणी केली. रमजान महिना सुरु झाला की वचनांनुसार प्रत्येक मिळकतदार महिला व पुरुषाने गरजूंना मदत देण्याचा संदेशही दिला. त्याचे पाईक बनून रमजान महिना सुरु झाल्यापासून ते समारोप होईपर्यंत मुस्लिम बांधवांकडून सढळ हाताने गरजूंना दान दिले जाते. दानधर्माची ही परंपरा शतकानुशतके सुरुच आहे. इतकेच नव्हे तर मागील पिढीकडून नव्या पिढीकडे दानधर्माचा वारसा सोपविला जात आहे. नवी पिढी देखील वाडवडीलांच्या आज्ञेनुसार वचनांचे पाईक बनून दानधर्म करत आहेत.

   सध्या रमजान महिना सुरु आहे. गेल्या 7 मेपासून रमजानला प्रारंभ झाला आहे. रविवारी (दि. 26) 20 रोजा पुर्ण झाला. पाच जुनपर्यंत रमजान महिना सुरु राहणार आहे. महिना संपल्यानंतर रमजान ईद साजरी होईल. तिची मुस्लिम बांधवांना चाहूलही लागली आहे. त्यामुळे वचनांची पुर्तता करण्यासाठी त्यांनी दानधर्माला जोर धरला आहे. पैशाबरोबरच गहू, कपडे, जीवनाश्यक वस्तु, गृहपयोगी साहित्य आदी स्वरुपात गरजूंना दान केले जात आहे. दुसरीकडे मुस्लिम बांधवांच्या घराघरात अन् मशिदींमध्ये कुराण शरीफच्या पठणाबरोबर जप, दुवा पठणदेखील होत आहे. मशीदींसह अनेक मुस्लिम बांधवांकडून प्रत्येक रोजा इफ्तारीची अचूक वेळ पकडत सर्व धर्मियांसाठी इफ्तार पार्टीचेही आयोजन केले जात आहे. लोकसुद्धा इफ्तार पार्टीत आपुलकीने सहभागी होऊन मुस्लिम बांधवांसोबत सर्व धर्म समभावासाठी दुवा करत आहेत.

   अशा सगळ्या वातावरणात मुस्लिम बांधवांकडून दिवसातून पाचवेळा नमाज पठणही केले जात आहे. नमाज पठणावेळी घरसंसार, औधषोचार, मुलांचे शिक्षण, रोजगार आदींसाठी आर्थिक मदत मिळेल, या आशेने गरजू लोक मशिदींमध्ये दाखल होत आहेत. मुस्लिम बांधव देखील दया दाखवत मदतीच्या अपेक्षेsने आलेल्या गरजूंच्या झोळीमध्ये पाच-दहा रुपयांपासून हजार रुपयांपर्यंतची मदत टाकू लागले आहेत. मदत मिळालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मुखातून अल्हा आपको सहीसलामत रखें असे शब्दही बाहेर पडू लागले आहे. मदत देणारे मुस्लिम सुद्धा गरजूंच्या बरकतीसाठी मशिदींमध्ये दुवा करत आहेत. जिह्यातील बैतुलमाल कमिटींचे कार्यकर्तेही प्रत्यक्ष मुस्लिम बांधवांकडे जाऊन वस्तू, पैसे, कपडे अशा स्वरुपात मदत मिळवू लागले आहेत. मुस्लिम बांधवही विनासंकोच कमिटीकडे आपल्याजवळील वस्तू व पैस दान देत आहेत. हे सर्व दान समाजातील गरजूंना वर्षभर दिले जाते.  

Related posts: