|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शेतकऱयांना गट शेती फायदेशीरः प्रा. डॉ. शहाजीराव वारके

शेतकऱयांना गट शेती फायदेशीरः प्रा. डॉ. शहाजीराव वारके 

वार्ताहर/ पिंपळगाव

गट शेतीमुळे शेतकऱयांचे जीवन समृद्ध होईल. यासाठी जिरायत भागातील शेतकऱयांनी गट शेती समजून घेऊन ती यशस्वी करावी. गटशेती ही शेतकऱयांना फायदेशीर व काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. शहाजीराव वारके यांनी केले.

दिंडेवाडी (ता.भुदरगड) येथील छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास आभियान व प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना प्रशिक्षण शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच श्रीधर भोईटे होते.

प्रास्ताविक स्वागत प्रा.संजय खोचारे यांनी केले. विविध मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले. मुख्य मार्गदर्शक आर.डी.पायघन (उस्मानाबाद) यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमास दिनकरराव भोईटे, उपसरपंच अशोक गुरव, ग्रा.पं. सदस्य गणेश मोरबाळे, दयानंद गुरव, मुरुक्टे गावचे उपसरपंच चंद्रकांत गुरव, शशिकांत फराक्टे, डॉ. एस.बी.भिऊंगडे, अशोक मोरबाळे, महादेव भोईटे, अशोक भोईटे, दयानंद ऱहाटवळ, लक्ष्मण माने यांच्यासह प्रशिक्षणार्थी शेतकरी उपस्थित होते. संजय गुरव यांनी आभार मानले