|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ध्यान मंदिराचे वर्धापन दिन लोकोत्सव व्हावेत:

ध्यान मंदिराचे वर्धापन दिन लोकोत्सव व्हावेत: 

वार्ताहर/ शिरगांव

महाराष्ट्रीयन लोकसंस्कृतीचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी व परंपरागत लोक परंपरा जपण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपत मनोरंजनातून समाज प्रबोधन करणाऱया लोककलाकारांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठीच ज्ञान ध्यान मंदिराचे वर्धापन दिन लोकोत्सव व्हावेत, असे प्रतिपादन साई उद्योग समुहाचे संस्थापक उद्योगपती चंद्रकांतदादा पाटील (कौलवकर) यांनी केले  .                           

राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हारवडे येथील अंबाबाई मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त देवस्थान कमिटी व घोडा ग्रुप यांच्यावतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम उद्घाटन व सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी देवस्थान समिती अध्यक्ष प्रकाश पाटील होते. सरपंच राजेंद्र चौगले, उपसरपंच सौ. सुशिला पाटील, तंटामुक्तचे प्रकाश पाटील, पो. पाटील अशोक पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वागत अशोक पाटील यांनी केले. घोडा ग्रुपचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी प्रास्ताविक केले. देवपुजारी पांडुरंग गुरव व मानकरी आणि खेडे मंडळी यांच्या हस्ते अंबाबाईची आकर्षक पेहरावात विधी सुंदर अश्वारूढ स्वरूपात पुजा बांधण्यात आली. उद्योगपती चंद्रकांतदादा पाटील (कौलवकर) यांचा शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दिवसभर चाललेल्या या सांस्कृतिक उपक्रमात पहाटे अंबाबाई मूर्तीस जल व पंचामृताचा अभिषेक घालण्यात आला. देवस्थान कमिटी सदस्य संजय पाटील, सातापा पाटील, सुभाष वरुटे, नंदकुमार चव्हाण, सागर पाटील, महिपती पाटील यांच्या हस्ते आरती, महाआरती करून तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. उत्तम चौगले, उत्तम पाटील, धीरज कांबळे, आनंदा कांबळे, माजी उपसरपंच गुरुनाथ पाटील, सचिन सुतार, तानाजी पाटील, माजी सरपंच शिवाजी पाटील, रंगराव चौगले, अवधूत हुजरे, वैभव पाटील, सौरभ पाटील, शैलेश गुरव, प्रकाश पाटील, कृष्णात टिपुगडे, मधुकर चौगुले, माहेरवासिनी, सुहासिनी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रल्हाद लिंगडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.