|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दोघा तरुणांवर चाकूहल्ला

दोघा तरुणांवर चाकूहल्ला 

काकती येथील घटना : जखमींवर इस्पितळात उपचार सुरू

प्रतिनिधी/ बेळगाव

 लग्नाची वरात काढण्यात येत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञातांनी दोघा तरुणांवर चाकूहल्ला केल्याची घटना काकती येथे रविवारी रात्री घडली. या चाकू हल्ल्यात अशोक मुनीयप्पा नाईक (वय 17) व विजय रामाप्पा हळवी (वय 17) दोघेही राहणार काकती हे जखमी झाले आहेत.

काकती येथील मरगाईगल्लीत रविवारी रात्री 9 वाजता एका लग्नाची धुमधडाक्यात वरात काढण्यात येत होती. यावेळी जमलेल्या गर्दीचा फायदा घेत काही अज्ञातांनी अशोक व विजय यांच्यावर चाकूहल्ला केला. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दोघाही जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र या घटनेत अशोकची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला रात्रीच एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच बेळगाव जिल्हा पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी आणि शहर उपपोलीस प्रमुख के. शिवारेड्डी यांनी इस्पितळाला भेट देऊन जखमींकडून माहिती घेतली.