|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » माजी सैनिक संघटनेची बैठक उत्साहात

माजी सैनिक संघटनेची बैठक उत्साहात 

प्रतिनिधी / बेळगाव

शौर्य चौक येथील माजी सैनिक संघटनेची बैठक रविवारी संघटनेच्या कार्यालयात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष के. बी. नौकुडकर होते. व्यासपीठावर व्हा. चेअरमन सी. आर. बेळगांवकर, पांडूरंग मेलगे, जनरल सेक्रेटरी कृष्णा बाळेकुंद्री उपस्थित होते.

प्रारंभी लक्ष्मण मुंगारे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शहीद झालेल्या जवानांना संघटनेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. वार्षिक अहवालवाचन सचिव गंगाराम गवस यांनी केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष के. बी. नौकुडकर म्हणाले, भारतीय लष्कराचा पायदळ विभाग हा भारतीय सशस्त्र सेनेचा एक मोठा घटक आहे. परकिय तसेच अंतर्गत आक्रमणांपासून देशाचे रक्षण करणे हे लष्कराचे काम आहे. आता या लष्करात तरुणींना देखील संधीत देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रंसगी पांडूरंग पाटील, नारायण पाटील, गोपाळ देसाई, हणमंत गुरव, रामा कोलेकर, अशोक पाटील, लक्ष्मण मुंगारे, नारायण पाटील, राजाराम पाटील, मारुती गुरव, यल्लाप्पा सागर, मल्लाप्पा चौगुले, विठ्ठल हुंदरे, यशवंत देसाई, डी. एस. हेब्बाळकर, प्रकाश माळवे, शंकर कावलेकर आदी माजी संघटनेचे सदस्य उपस्थित होते..