|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कारने ट्रकला धडक दिल्याने पाचजण ठार

कारने ट्रकला धडक दिल्याने पाचजण ठार 

वार्ताहर/ हुबळी

कारचे टायर ब्लास्ट होऊन वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला जोराची धडक बसून पाचजण ठार झाले. ही घटना हुबळी-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील अमरगोळ क्रॉसजवळ रविवारी दुपारी घडली. रवी जंबुलिंगप्पा हंडी (वय 45), लेखाश्री रवी हंडी (वय 19), नवीन रवी हंडी (वय 15), चरंत विनोद जिगजिन्नी (वय 19) आणि आनंद जिगजिन्नी (वय 14) अशी मृतांची नावे आहेत. मृत सर्वजण बागलकोट जिल्हय़ातील ऐहोळ्ळी येथील आहेत.

हुबळीहून बागलकोटला जाताना सदर अपघात घडला आहे. यावेळी तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघांचा इस्पितळाला घेऊन जाताना वाटेतच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी नवलगुंदचे सीपीआय रंगनाथ, पीएसआय जयपाल पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला. अपघाताची नोंद नवलगुंद पोलीस स्थानकात झाली आहे.