|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » येळ्ळूर-वडगाव रस्त्यावर मोठी दुर्घटना टळली

येळ्ळूर-वडगाव रस्त्यावर मोठी दुर्घटना टळली 

प्रतिनिधी/ बेळगाव

येळ्ळूर-वडगाव मार्गावर सकाळी 6 च्या सुमारास मोठी दुर्घटना होताना टळली. बसचे बेरींग तुटून चालकाचा ताबा सुटल्याने बस शेतात घसुली. सुदैवानेच या घटनेत जीवीत हानी झाली नाही. सकाळच्या सुमारास या बसमध्ये केवळ चालक आणि वाहक होते.

ही घटना येळ्ळूर गावाजनीक असलेल्या पेट्रोलपंपाजवळ घडली आहे. रविवारी पहाटे सहाच्या सुमारास येळ्ळूरहून सीबीटीकडे जात असताना हा अपघात घडला आहे. बसचे बेरींग तुटल्याने बस शेतात घुसली. सकाळी सकाळी ही घटना घडल्याने परिसरातील शेतकऱयांनी या बसकडे धाव घेवून कोणी जखमी झाले आहे का? याची पाहणी केली. मात्र वाहक आणि चालक हे दोघेही सुखरुप होते.