|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » निवडणूक प्रक्रिया उधळून लावण्यासाठी पेरलेला बाँम्ब फुटला

निवडणूक प्रक्रिया उधळून लावण्यासाठी पेरलेला बाँम्ब फुटला 

 ऑनलाईन टीम / सराईकेला :

नक्षलवाद्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी झारखंडच्या सराईकेला येथे पेरलेला आयईडी बॉम्ब कोब्रा जवान आणि झारखंड पोलिसांच्या तुकडीजवळ मंगळवारी फुटला. या स्फोटामध्ये कोब्रा बटालियनचे 8 जवान आणि 3 पोलीस जखमी झाले. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

हा आयईडी बॉम्ब निवडणूक प्रक्रिया उधळून लावण्यासाठी पेरण्यात आला होता. हा परिसर साफ करण्यासाठी कोब्रा जवान आणि पोलिसांची संयुक्त तुकडी काम करत होती. त्यावेळी हा स्फोट झाला. जखमी जवानांना मंगळवारी सकाळी 6.52 मिनिटांनी रांचीमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

 

Related posts: