|Friday, December 6, 2019
You are here: Home » leadingnews » नरेंद्र मोदी आज दुसऱयांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार

नरेंद्र मोदी आज दुसऱयांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार 

राष्ट्रपती भवनात सायंकाळी 7 वाजता शपथ घेणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सात वाजता जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही देशाच्या पंतप्रधानपदी दुसऱयांदा विराजमान होतील. राष्ट्रपती भवनात होणाऱया या शपथविधी सोहळय़ासाठी सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ासाठी असलेल्या सुरक्षाव्यवस्थेप्रमाणे व्यवस्था या सोहळय़ासाठी करण्यात आली आहे. आर्मी, वायुसेना आणि दिल्ली पोलिसांच्या 10 हजाराहून अधिक जवानांची फौज या सोहळय़ासाठी तैनात करण्यात आली आहे. या सोहळय़ासाठी विविध देशांचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह अनेक महत्वाच्या व्यक्ती एकाच स्थानी येणार आहेत. यामुळे सुरक्षेच्या प्रोटोकॉलप्रमाणे सगळी व्यवस्था करण्यात आली आहे.

मोदींच्या शपथविधी सोहळय़ासाठी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्लीला रवाना झाले आहेत. याशिवाय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार  

सदानंद गौडा, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, बाबुल सुप्रियो, जितेंद्र सिंग, अर्जुन मेघवाल, रामविलास पासवान, रामदास आठवले, सुरेश आंघडी आदी

शिवसेनेचे आरविंद सावंत शपथ घेणार

शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार अरविंद सावंत आज नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेणार आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून अरविंद सावंत यांचे नाव मंत्रिपदासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे आज संध्याकाळी सावंत मंत्रिपदाची शपथ घेतील, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

दरम्यान, खासदार अरविंद सावंत भल्या पहाटे त्यांच्या शिवडी इथल्या घरातून दिल्लीसाठी रवाना झाले. अरविंद सावंत यांचं कुटुंबही शपथविधीसाठी दिल्लीत उपस्थित राहणार आहेत.

 

 

Related posts: