|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कराड-चिपळूण मार्गावर मेगा ब्लॉक

कराड-चिपळूण मार्गावर मेगा ब्लॉक 

प्रतिनिधी/ नवारस्ता

कराड-चिपळूण मार्गावर कुंभार्ली घाटात एका तीव्र वळणावर शुक्रवारी दुपारी टॅंकर अडकल्यामुळे हा मार्ग तब्बल चार तास बंद झाला. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची शुक्रवारी दिवसभर गैरसोय झाली.

   कराड-चिपळूण मार्गावर कुंभार्ली घाटात शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुंबई कळंबोली येथील नावा शिवा बंदर येथून चिपळूण जवळील लोटेच्या दिशेने निघालेला टॅंकर कुंभार्ली घाटातील वन विभागाच्या चेक नाक्याजवळ घाटमाथ्याच्या हद्दीत एका तीव्र वळणावर अचानक अडकला. परिणामी या मार्गावरील चिपळूण, रत्नागिरी, मुंबई, पुणे आणि कराडकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे या मार्गावरील प्रवाशांची फार मोठी गैरसोय झाली. अलोरे, शिरगाव तसेच कोयना पोलिसांच्या मदतीमुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु होता. कोयना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटमुळे कोयना पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टे, पोलीस हवालदार सुरेश बोबडे व पथकाने या मार्गावरील प्रथम वाहतूक खुली करण्यात यश मिळवले. त्यानंतर सायंकाळी उशिरा क्रेनच्या साह्याने हा टॅंकर बाजूला घेण्याचे काम सुरु होते.

 

Related posts: