|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » सोनिया गांधी संसदीय दलाच्या नेतेपदी कायम

सोनिया गांधी संसदीय दलाच्या नेतेपदी कायम 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधी कायम राहणार असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंह उपस्थित होते.

आज लोकसभेत काँग्रेसचा नेता निवडण्यासाठी काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. लोकसभेच्या पुढील सत्रासाठी रणनिती ठरविण्यात येणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत. त्यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारल्यास राहुल यांच्याकडे लोकसभेचे नेतेपद देण्यात येईल, अशी शक्मयता होती. मात्र, राहुल यांनी लोकसभेचे नेतेपद नाकारल्याने या पदासाठी मनिष तिवारी आणि शशी थरूर यांचा विचार होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.

Related posts: