|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » Top News » भाजपविरोधात इंच-इंच लढण्याचा राहुल गांधींचा निर्धार

भाजपविरोधात इंच-इंच लढण्याचा राहुल गांधींचा निर्धार 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताचे संविधान वाचविण्यासाठीच काँग्रेसची लढाई आहे. प्रत्येकाने हे लक्षात ठेऊनच पुढील वाटचाल करावी. तसेच भाजपविरोधात लढण्यासाठी काँग्रेसचे 52 खासदारच पुरेसे असून, आम्ही त्यासाठी इंच-इंच लढू, असा निर्धारही राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक आज पार पडली. त्या बैठकीत सोनिया गांधींची एकमताने संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यंदा केवळ 52 जागांवर विजय मिळवता आला. दोन जागा कमी पडल्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदही काँग्रेसला मिळाले नाही. त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकाऱयांनी खचून जाऊ नये, संविधान वाचविण्यासाठी इंच-इंच लढाई सुरु ठेवायची असल्याचेही राहुल यांनी खासदारांना सांगितले.

Related posts: