|Saturday, January 25, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » भाजपविरोधात इंच-इंच लढू

भाजपविरोधात इंच-इंच लढू 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

‘आपला लढा हा भारतीय घटनेचे संरक्षण करण्यासाठी आहे. त्याचबरोबर कोणताही भेदभाव न करता प्रत्येक देशवासीयाच्या न्याय हक्कांसाठी आपण लढत आहोत. आपल्या पक्षाचे 52 खासदार संसदेत असतील; पण भाजपविरोधात इंच-इंच लढण्यासाठी तेवढेच पुरेसे आहेत, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपविरोधात संघर्षाचे बिगुल पुंकले. शनिवारी
काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झाली. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, काँग्रेस संसदीय नेतेपदी सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली.

 बैठकीत राहुल गांधी यांनी काँग्रेसवर विश्वास दाखवलेल्या 12 कोटी मतदारांसह कार्यकर्त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, आपला लढा हा भारतीय राज्यघटनेच्या संरक्षणासाठी आहे, तसेच कोणताही भेदभाव न करता देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांसाठाही आहे. भविष्यात अधिक ताकदीने आणि आक्रमकपणे लढणे आवश्यक आहे. लोकसभेमध्ये काँग्रेसचे 52 खासदारच आहेत. मी तुम्हाला विश्वास देतो की, हेच 52 जण भाजपविरोधात इंच-इंच लढण्यासाठी पुरेसे असल्याचे सांगत त्यांनी भविष्यातील संघर्षासाठी तयार राहा, असे आवाहन काँग्रेस खासदारांना केले.

         सोनिया गांधींची काँग्रेस संसदीय नेतेपदी निवड

यावेळी काँग्रेस संसदीय नेतेपदी सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली.  त्या म्हणाल्या, काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी विरोधी पक्षाची प्रभावी भूमिका पार पडणे गरजेचे आहे. जनहिताच्या प्रश्नांसाठी संसदेमध्ये आपली मते जोरकसपणे मांडा. सकारात्मक बाबींसाठी पक्ष नेहमीच सरकारला मदत करेल;पण जनहिताविरोधातील निर्णयांचा आम्ही विरोध करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी काँग्रेसला मतदान केलेल्या 12.3 कोटी मतदारांसह कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांनी घेतलेल्या परिश्रमाचाही कौतुक केले.

 काँग्रेस विरोधी पक्ष नेतेपदासाठी दावा करणार नाही

विरोधी पक्ष नेतेपदासाठी आमच्याकडे आवश्यक संख्याबळ नाही. त्यामुळे या पदासाठी आम्ही दावा करणार नाही, असे शनिवारी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाल यांनी स्पष्ट केले. 2014च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसचे 44 खासदार होते. त्यामुळे पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद मिळाले नव्हते. विरोधी पक्ष नेतेपदासाठी लोकसभेतील एकुण खासदारांच्या 10 टक्के सदस्य संख्या आवश्यक आहे. काँग्रेसला या पदासाठी दोन खासदार कमी आहेत. त्यामुळे आम्ही आवश्यक संख्याबळ मिळेपर्यत विरोधी पक्ष नेतेपदाची मागणी करणार नसल्याचे सुरजेवाल यांनी सांगितले. दरम्यान, विरोधी पक्ष नेतेपदाचा दर्जा देण्याबाबतचा निर्णय सरकारचा घेणार आहे. त्यामुळे आता भाजप सरकारच्या निर्णयाकडे काँग्रेसचे लक्ष लागले आहे.

Related posts: