|Saturday, February 22, 2020
You are here: Home » Top News » विराट कोहलीच्या आंगठय़ाला दुखापत

विराट कोहलीच्या आंगठय़ाला दुखापत 

ऑनलाईन टीम / लंडन :

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटच्या सरवादरम्यान जखमी झाला आहे. कोहलीच्या आंगठय़ाला दुखापत झाली आहे. संघ व्यवस्थापनातर्फे कोहलीच्या दुखापतीबद्दल अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. भारतीय संघ पाच तारखेला विश्वचषकातील पहिला सामना खेळणार आहे.

कोहलीच्या आंगठय़ाला दुखापत होताच संघाचे फिजिओ पॅट्रीक फराहत यांनी तात्काळ विराटच्या आंगठय़ावर स्प्रे मारुन प्राथमिक उपचार केले. त्यानंतर कोहलीने सराव अर्धवट सोडून गेला. विश्वचषकातील पहिल्या सामन्यापूर्वी कर्णधाराला दुखापत झाल्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Related posts: