|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » रॉबर्ट वड्रा यांना लंडन वगळता इतर देशात उपचारासाठी परवानगी

रॉबर्ट वड्रा यांना लंडन वगळता इतर देशात उपचारासाठी परवानगी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांना उपचारांसाठी सहा आठवडे परदेशात जाण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्यायालयाने त्यांच्याविरोधात काढण्यात आलेली लूक आऊट नोटीस या सहा आठवडय़ांच्या काळात निलंबित राहणार असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

मनी लॉड्रिंगप्रकरणी चौकशी सुरु असल्याने रॉबर्ट यांना उपचारासाठी परदेशात जाण्यासाठी ईडी आणि सीबीआयने आक्षेप घेतला होता. मात्र, वैद्यकीय कारणांसाठी न्यायालयाने त्यांना परवानगी दिली आहे. आतडय़ातील टय़ूमरच्या उपचारासाठी लंडनला जाण्याची परवानगी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. मात्र, न्यायालयाने ती विनंती फेटाळून अमेरिका, नेदरलँडसह कुठेही उपचार घेण्याची परवानगी दिली आहे.

Related posts: