|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » भारतीय क्रिकेट संघाच्या पत्रकार परिषदेवर मीडियाचा बहिष्कार

भारतीय क्रिकेट संघाच्या पत्रकार परिषदेवर मीडियाचा बहिष्कार 

ऑनलाईन टीम / साउथहॅम्प्टन :

भारतीय क्रिकेट संघाच्या पत्रकार परिषदेवर प्रसारमाध्यमांनी बहिष्कार टाकला आहे. आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील बुधवारी होणाऱया पहिल्या सामन्याला सामोरे जाण्यापूर्वी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेसाठी संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री किंवा संघातील वरि÷ खेळाडू येणे अपेक्षित होते. मात्र, संघ व्यवस्थापनाने खलील अहमद, अवेश खान आणि दीपक चहर यांना पाठवले. त्यामुळे नाराज झालेल्या मीडियाने परिषदेवर बहिष्कार टाकला आहे.

भारतीय संघाचे सदस्य नसलेल्या खेळाडूंना पत्रकार परिषदेत पाठवण्यामागचा नेमका उद्देश काय आहे, याबाबत प्रश्न उपस्थित करत माध्यमांनी क्रिकेट संघाला धारेवर धरले. संघ व्यवस्थापनाने पत्रकार परिषदेसाठी नेट बॉलर्संना पाठवण्याचा निर्णय घेतल्यानेच माध्यमांनी पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला.