|Saturday, January 25, 2020
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

अत्यंतपुजनीय पिंपळवृक्ष

बुध. 5 जून ते 11 जून 2019

पिंपळाविषयी लिहिलेला लेख अनेकांना आवडला व जीवनातील समस्यावर बरीच  उद्बोधक माहिती मिळाल्याचे अनेकांनी सांंिगतले तर काही जणांना टीकाही केली पिंपळाला रोज शिवल्याने दारिद्रय़ कसे  येईल असा प्रश्नही काहीजणांनी उपस्थित केला अशा लोकांनी रोज पिंपळाला स्पर्श करून अनुभव पाहण्यास हरकत नाही. प्रत्येकाचे बरेवाईट कर्म त्याच्यावरच उलटते हे शिकविणारा वृक्षराज म्हणजे पिंपळ होय. पिंपळाचे अनेक उपयोग आहेत आहे पण त्याचा दुरुपयोग व व्यापारीकरण होण्याची शक्मयता अधिक त्यामुळे काही गोष्टी गुप्त ठेवणे आवश्यक ठरते पत्रिकेतील ग्रहमानानुसार पिंपळवृक्षाचे पूजन कसे व कोणत्या प्रकारे फळ देईल हे सांगता येते पिंपळाविषयी असंख्य ग्रंथ लिहिता येतील. इतकी प्रचंड माहिती मिळू शकते मुलबाळ होत नाही त्यांनी पिंपळाला आपला पुत्र मानावा म्हणजे घराण्याचे नाव कायम रहाते असे एका ठिकाणी आहे. मोहेंजोदारो संस्कृति व सत्ययुगात पिंपळाला अतिशय महत्त्व असल्याने दाखले आहेत. पिंपळावर घराण्यातील पितर व इतर आत्म्यांचा वास असतो. पिंपळावरील मुंजा हा शब्द तरी पूर्वीपासूनच रुढ आहे. विष्णुचा जन्म पिंपळाखाली झाल्याचा पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे जे कुणी पौष मासात पिंपळाखाली बसून विष्णुसहस्त्रनाम  वाचतील त्यांच्यावर विष्णुची व लक्ष्मीची कृपा राहील तसेच त्रिपिंडी श्राद्धाच्यावेळी पिंपळाखाली विष्णु सहस्त्रनाम वाचतील त्यांचे सर्व प्रखर शापीत दोष नष्ट होतात. पिंपळाच्या मुळात ब्रह्मदेव व खोडात श्रीविष्णू तसेच पानात शंकर यांचा वास असतो. कृष्णाचा मृत्यूही पिंपळाच्या झाडाखालीच झाला व तेव्हापासून कलियुगाची सुरुवातही झाली. पिंपळाच्या पानात कृष्णाचे वास्तव असते भगवद्गीता जर पिंपळाखाली बसून वाचल्यास कृष्णाची कृपा होते स्कंद पुराणात सरस्वतीचा जन्म ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून पिंपळाच्या मुळाशी झाल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे पिंपळाखाली बसून सरस्वती आराधना केल्यास शिक्षणात उत्तम यश मिळते. पिंपळ हा ब्राह्मण वृक्ष मानलेला आहे. त्यामुळे पिंपळवृक्षाची तोड म्हणजे ब्राह्मणाची हत्या समजतात  त्यामुळे निर्वंश होतो तसेच लक्ष्मीची अवकृपा होते त्यामुळे ब्रह्मशाप लागतो पिंपळात वास्तव्य करणाऱया दोन राक्षसांना शनिने ठार केले त्यामुळे शनिवारी पिंपळाचे पूजन केल्यास शनिची कृपा लाभते व साडेसातीचा त्रास होत नाही. कुबेराने देवांची सारी संपत्ती पिंपळात ठेवलेली आहे व त्याच्या रक्षणासाठी कली नेमलेला आहे. त्यामुळे जे कुणी वाईट भावनेने अथवा अस्वच्छ अवस्थेत तसेच मद्यपान केलेल्या स्थितीत पिंपळाला स्पर्श करतील. अथवा भांडण तंटे शिवीगाळ करतील त्यांच्यावर कलीच्या प्रभावाने अवदसा घरात शिरते व दारिद्रय़ येते. पिंपळाचे पूजन कसे करावे कोणत्या वारी कोणत्या राशीने त्याची आराधना केल्यास काय फळ मिळते यावरही सविस्तर माहिती अनेक ग्रंथात मिळते पण हे सारे ज्ञान भांडार संस्कृतमध्ये असल्याचे सांगण्यात येते.

मेष

या आठवडय़ात धनस्थानी शुक्र व त्याच्याशी गुरुचा होणारा प्रतियोग मोठे धनलाभ घडविण्याची शक्मयता आहे. चार ग्रह एकत्र आहेत त्यामुळे केणतेही काम सावधपणाने करावे. सरकारी कामातील अडथळे वाढतील पण तरी कामे मात्र होतील. मानसन्मान प्रति÷ा यांच्या मागे न लागता नेहमीची कार्ये करीत रहा.


वृषभ

राशिस्वामी शुक्र बेहद्ध खूष आहे. त्यामुळे अति महत्त्वाची कामे होऊ लागतील. चैन व किरकोळ कारणासाठी बराच खर्च होईल. अनेक मार्गाने धनलाभाची शक्मयता. पण टिकण्याची शक्मयता कमी. विशेषत: महत्त्वाच्या गुप्त गोष्टींची वाच्यता करू नका. अन्यथा कुणीतरी त्याचा गैरफायदा घेण्याची शक्मयता आहे. संततीविषयक इच्छा मात्र पूर्ण होतील.


मिथुन

बाराव्या स्थानी शुक्र आहे. हा योग जितका लाभ त्याच्या दुप्पट खर्च दाखवितो त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. जेथे सायकलने काम भागते तेथे कार अथवा मोटार सायकलचा वापर करू नका.  भाग्योदय भरभरटीच्या दृष्टीने वाटचाल सुरू होईल.अनेक इच्छा पूर्ण होतील. नोकरीत स्थलांतर अथवा प्रवास योग, मानसिक समाधान देणाऱया घटना पण कोणत्याही बाबतीत अतिरेक करू नका.


कर्क

लाभात शुक्र म्हणजे कुबेर व लक्ष्मीची कृपा म्हणता येईल. धनलाभाचे अनुकूल योग. एखाद्याच्या पायगुणाने या आठवडय़ात भाग्योदयाच्या दृष्टीने चांगले अनुभव येतील. आयुष्यात कधीही पाहिला नसाल असे मोठे यश किंवा ऐश्वर्य लाभेल पण तुमच्या मूळ कुंडलीत तसे योग असावे लागतात. नोकरी व्यवसायात अतिशय लाभदायक वातावरण.


सिंह

राशिस्वामी रवि लाभात बलशाली आहे. त्यामुळे अत्यंत अवघड कामातदेखील सहज यश मिळवाल. शुक्र दशमात त्यामुळे अपघात,आजार, गैरसमज, शस्त्रक्रिया, शत्रुत्व, प्रेमप्रकरणे व त्यात फसवणूक यातून बचाव होईल. धबधबे समुद्रस्नान अथवा खोल दऱया, टोकदार कडेकपाऱया यांच्याशी दंगामस्ती अथवा सेल्फी अंगलट येण्याची शक्मयता.


कन्या

राश्याधिपती बुध तीन ग्रहानं विरुद्ध आहे. प्रबळ आहे. कोणतेही मोठे काम यशस्वी करून दाखवाल. प्रेमप्रकरणे व अती सलगी यापासून चार हात दूर रहा. देखणे असाल तर गुंड प्रवृत्तीचे लोक प्रेमात ओढण्याचा प्रयत्न करतील. तरुणींनी विशेष खबरदारी घ्यावी. नको त्या प्रकरणात गुंतविण्याचा प्रयत्न होईल. कोणतेही धाडस अंगलट येऊ शकते.


तूळ

चंद्र, हर्षल प्रतियोगामुळे अचानक अनाकलनीय प्रसंग घडून विवाह ठरण्याचे योग. आर्थिक दृष्टय़ा अति महत्त्वाचे शुभयोग पण कागदोपत्री व्यवहारात फसगत तसेच काही अघोरी प्रयोगांचीही शक्मयता राहील. राश्याधिपती शुक्र अष्टमात स्वगृही आहे. त्यामुळे जगावेगळे काही तरी करून दाखवाल. इतर मार्गाने मोठय़ा प्रमाणात धनलाभाची शक्मयता.


वृश्चिक

शुक्र, चंद्राचा शुभ योग वैवाहिक सौख्यात वाढ करील. तुमच्या वास्तुत काही दोष असतील तर वास्तुशास्त्राच्या मागे न लागता केवळ मंत्रपठण सुरू करून पहा. संपूर्ण वातावरण बदलून जाईल व कुटुंबात सुखसमृद्धी लाभेल. शत्रुपीडा व अपघातापासून जपावे लागेल. चार ग्रह अष्टमात आहेत. कोणतेही अविचारी धाडस करू नका. तसेच खर्चावरही नियंत्रण ठेवा.


धनु

चार ग्रहांची युती सप्तमात होत आहे. वैवाहिक जीवन व भागीदारी व्यवसायात काळजी घ्या. काही तरी गडबड गोंधळ होण्याची शक्मयता. नको त्या अध्यात्मिकच्या मागे लागल्याने सर्वस्व गमावून बसाल. त्यासाठी व्यवहारी वृत्ती व प्रसंगावधान ठेवून वागा. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय चांगले योग प्रमोशन, इच्छीत स्थळी बदली.


मकर

शुक्र पंचमात हा दैवी कृपा दर्शविणारा योग आहे. स्वत:ची वास्तू होऊ शकेल. धनलाभाचे चांगले योग खर्च मात्र वाढतील. वाहन जपून चालवा. सर्व तऱहेने भाग्योदयकारक ग्रहमान आहे. उच्च शिक्षित व सुसंस्कृत असाल. घरात पावित्र्य असेल तसेच संकल्प पवित्र असेल तर मनातील अवघड इच्छाही पूर्ण होऊ शकतील. धनलाभ प्रवास शिक्षण नोकरी व संततीच्या दृष्टीने चांगले अनुभव येतील विहीर बोअर व वास्तु संदर्भात अनुकूल योग.


कुंभ

चतुर्थातील शुक्रामुळे घरगुती वातावरण चांगले राहील. वास्तुतील नको असलेली अडगळ काढा. इतरांनी दिलेल्या जुन्या व बाद झालेल्या वस्तू चुकूनही घरात ठेवू नका. अन्यथा राहू प्रभावीत होऊन महत्त्वाची कामे खोळंबतील योग्य माणसला जर नको ते काम दिल्यास त्याची काय अवस्था होईल, असा प्रश्न निर्माण करणारे ग्रहमान आहे. अशावेळी मन शांत ठेवून मगच निर्णय घ्यावे लागतात.


मीन

जागेच्या व्यवहारात फसवणूक होईल. सावध रहा. जुनाट देणी निघतील. पैशासाठी तगादा व ब्लॅकमेल करण्याची धमकी असे प्रकार घडतील. मोबाईलवर नको ते आक्षेपार्ह फोटो व मजकूर टाकल्याने अन्यथा नको ते प्रकरणात फसाल. स्वत:चे कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळेल. धनलाभाचे योग. मोठय़ा प्रमाणात लाभ होण्याचे योग. धनलाभा व्यतिरिक्त वास्तू जागा, वाहन यांचाही लाभ होण्याची शक्मयता.

Related posts: