|Monday, September 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » पूजा सावंत कल्याण ज्वेलर्सची  ब्रँड ऍम्बेसिडर

पूजा सावंत कल्याण ज्वेलर्सची  ब्रँड ऍम्बेसिडर 

 

 पुणे / प्रतिनिधी :  कल्याण ज्वेलर्सने चित्रपट अभिनेत्री पूजा सावंत यांची महाराष्ट्र राज्याची प्रादेशिक ऍम्बेसिडर आणि इन्फ्लूएन्सर म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. कल्याण ज्वेलर्सचे स्थानिक अभियान तसेच प्रमोशन्समध्येही संबंधित अभिनेत्री झळकणार आहे.

कल्याण ज्वेलर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय रघुरामन म्हणाले, महाराष्ट्रासाठी प्रादेशिक ऍम्बेसिडर आणि इन्फ्लूएन्सर म्हणून पूजा सावंत यांची नियुक्ती झाल्याचा आम्हाला आनंद आहे. पूजा यांनी कल्याण ज्वेलर्सप्रमाणे आपल्या कठोर मेहनतीतून स्वतःचा मार्ग आखला आहे. महाराष्ट्रासाठी आम्ही महत्त्वाकांक्षी विस्तार योजना आखल्या असून, ते महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी एक आहे. आम्ही लवकरच मुहूर्त ब्रँडअंतर्गत स्थानिक दागिने उपलब्ध करत आमची श्रेणी विस्तारणार आहोत. पूजा या स्टाइल आयकॉन म्हणून उदयास आल्या असून, तरुण ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि ब्रँडची प्रति÷ा विस्तारण्यासाठी त्यांची लक्षणीय मदत होईल.

पूजा सावंत म्हणाल्या, कल्याण ज्वेलर्स हा प्रसिद्ध ब्रँड आहे आणि कल्याण कुटुंबाचा भाग होताना मला आनंद होत आहे. मी स्वतः कल्याण ज्वेलरीच्या मोहक दागिन्यांची चाहती आहे.