|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Top News » इंडियाची वर्ल्डकप मोहिम आजपासून

इंडियाची वर्ल्डकप मोहिम आजपासून 

ऑनलाईन टीम / साउथहॅम्पटन :

टीम इंडियाच्या वनडे वर्ल्डकप मोहिमेला आजपासून सुरुवात होत आहे. भारतीय क्रिकेट संघाची आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढत होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी अडीच वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेपेक्षा वरचढ असणार आहे. मात्र, सडतोड प्रत्युत्तर देण्याचा दक्षिण आफ्रिकेकडूनही जोरदार प्रयत्न होईल, त्यामुळे एक चुरशीची लढत पहायला मिळणार आहे. भारतीय फलंदाजांनी पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडच्या स्विंग गोलंदाजीसमोर शरणागती पत्करली होती. दुसऱया सराव सामन्यात मात्र भारताने बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई करून 359 धावांपर्यंत मजल मारली होती. 2017 मध्ये येथे पार पडलेल्या चॅम्पयिन्स ट्रॉफीतील पराभवाने आम्हाला धडे दिले आहेत. त्या त्चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिली आहे.