|Monday, February 17, 2020
You are here: Home » leadingnews » भाजपाची कोटीच्या कोटी उड्डाणे

भाजपाची कोटीच्या कोटी उड्डाणे 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकटय़ा भाजप पक्षाने तब्बल 27 हजार कोटी रुपये खर्च केला आहे. तर एकूणच सर्व राजकीय पक्षांचा खर्च 60 हजार कोटीवर पोहचला आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक सर्वात महागडी निवडणूक ठरली आहे. सेंटर फॉर मीडीया स्टडीजच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

हा अहवाल दुय्यम स्तरावरील माहितीवर आधारित असून, त्यामध्ये प्रत्यक्ष अभ्यास आणि विश्लेषण करण्यात आले आहे. अहवालानुसार एका मतदारासाठी 700 रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच 12 ते 15 हजार कोटी रुपये मतदारांना वाटण्यात आले, तर 20 ते 25 हजार कोटी रुपये प्रसिद्धी मिळविण्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. वाहतुकीसाठी 5 हजार कोटी, औपचारिक खर्च 10 ते 12 कोटी आणि अन्य खर्चासाठी 3 ते 6 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.

तर सर्व भ्रष्टाचाराची जननी ही या निवडणुकीच्या खर्चामध्ये आहे. जर आपण हे मूळ शोधू शकलो नाही, तर भारतातील भ्रष्टाचार संपवू शकणार नाही, असे सीएमएसचे अध्यक्ष एन भास्करा राव यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे.

Related posts: