|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » ज्येष्ठ अभिनेते दिनयार कॉन्ट्रक्टर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते दिनयार कॉन्ट्रक्टर यांचे निधन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

गुजराती आणि हिंदी चित्रपटांमधून रंगभूमी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते दिनयार कॉन्ट्रक्टर यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. आज सायंकाळी वरळी येथील प्रेयर हॉलमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या जाण्याने रंगभूमी आणि चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

रंगभूमी आणि नाट्यक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 2019 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘बाजीगर’, ‘खिलाडी’, ‘बादशाह’, यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका आणि अनेक लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. पंतप्रधान नरेंद मोदींनी ही त्यांना ट्विटरवरुन आदरांजली वाहिली आहे.