|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News » शालिमार एक्स्प्रेसमध्ये आढळल्या जिलेटीनच्या कांडय़ा

शालिमार एक्स्प्रेसमध्ये आढळल्या जिलेटीनच्या कांडय़ा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

लोकमान्य टिळक टर्मिनलवर उभ्या असलेल्या मध्य रेल्वेच्या शालिमार एक्सप्रेसमध्ये बुधवारी दुपारी जिलेटीनच्या 5 कांडय़ा आढळल्याने एकच खळबळ उडाली. शालिमार एक्सप्रेसची साफसफाई करताना या कांडय़ा सापडल्या. घटनास्थळी बाँम्बशोधपथकासह जीआरपीएफ आणि आरपीएफचे जवान दाखल झाले आहेत.

पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा वाढवून संपूर्ण एलटीटी परिसर रिकामा केला आहे. इसिसचे 15 दहशतवादी सागरी मार्गाने लक्षद्वीपकडे रवाना झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे केरळसह संपूर्ण किनारपट्टीवरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

रेल्वे सुरक्षा बल, पोलीस, होमगार्ड, महाराष्ट्र सुरक्षा बल या सुरक्षा बलाकडून प्रत्येक स्थानकावर पहारा चोख ठेवण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱयांनी श्वान पथक, बॉम्ब शोधक आणि निकामी पथक, ऑपरेशन बॉक्स, कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे.

Related posts: