|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » पुलवामात दहशतवाद्यांच्या गोळीबारात महिला ठार

पुलवामात दहशतवाद्यांच्या गोळीबारात महिला ठार 

ऑनलाईन टीम / पुलवामा :

पुलवामातील एका घरात घुसून दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

नगीना असे या मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नगीना यांच्या घरात ईद साजरी होत असतानाच दहशतवादी त्यांच्या घरात घुसले. नगीना यांना काही कळण्याच्या आतच दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. त्यामध्ये नगीना यांचा मृत्यू झाल नगीना यांचे पती युसुफ लोन यांचीही दोन वर्षांपूर्वी अज्ञातांनी हत्या केली होती. भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांचा शोध घेतला आहे.

Related posts: