|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Top News » मोदी सरकारकडून ‘कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी’ची स्थापना

मोदी सरकारकडून ‘कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी’ची स्थापना 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मोदी सरकारने सुरक्षेच्या मुद्यांसाठी ‘कॅबिनेट कमिटी ऑन सिक्मयुरिटी’ (सीसीएस) कमिटीची स्थापना केली आहे. देशातील सुरक्षेतेसंदर्भातील सर्व निर्णय घेणाऱया या कमिटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या समावेश आहे.

राजनाथ सिंह आणि निर्मला सीतारामण यांचा पूर्वीच्या कमिटीत सहभाग होता. अमित शहा आणि एस. जयशंकर यांना पहिल्यांदाच या कमिटीत स्थान मिळाले आहे. यापूर्वीच्या कमिटीत राजनाथ सिंह गृहमंत्री म्हणून होते, तर निर्मला सीतारमण संरक्षणमंत्री म्हणून होत्या. मोदी सरकार-2 मध्ये निर्मला सीतारामण यांच्याकडे अर्थमंत्रीपद देण्यात आले आहे. तर, राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.