|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » चहलपुढे अफ्रिकेची त्रेधातिरपिट

चहलपुढे अफ्रिकेची त्रेधातिरपिट 

 

 ऑनलाईन टीम / लंडन :  टीम इंडियाचा रिस्क स्पिनर यजुवेंद्र चहल आणि जसप्रित बुमराह यांच्या अफलातून गोलंदाजीसमोर दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांची अक्षरशः त्रेधातिरपिट उडाली.

भारताच्या विश्वचषकाच्या मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. दक्षिण अफ्रिपेने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, हा निर्णय अफ्रिकेच्या चांगलाच अंगलट आला. दक्षिण अफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचे ओपनर्स अवघ्या 24 धावांमध्ये पॅव्हेलियनमध्ये परतले. बुमराहने सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये दक्षिण अफ्रिकेला धक्के दिले. आमला व डिकॉकला त्याने पाठोपाठ बाद केले. त्यानंतर दुसे आणि कर्णधार डुप्लिसेस यांनी अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, चहलने एकाच ओव्हरमध्ये या दोघांना बाद करून अफ्रिकेला सावरण्याची संधीच दिली नाही. या वेळी दक्षिण अप्रेकची चार बाद 80 अशी अवस्था झाली. मिलर व फेलुकवायोलाही त्यानेच बाद केले. या दोघांनी प्रत्येकी 31 व 34 धावा केल्या. तर डय़ुमिनीला कुलदीप यादवने घरचा रस्ता दाखविला. 46 व्या षटकात अफ्रिकेने कशीबशी 200 धावांपर्यंत मजल मारली.