|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News » भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी मोदींना पत्र

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी मोदींना पत्र 

 पुणे / प्रतिनिधी :  महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व त्यांच्या सहकारी फातिमा बेगम यांनी ज्या भिडेवाडय़ात महिलांना सामाजिक गुलामगिरी व अज्ञानापासून मुक्त करण्यासाठी 1 जानेवारी 1848 रोजी मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्या भिडेवाडय़ास राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करण्यात यावे, अशी मागणी भिडेवाडा बचाव मोहिमेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत फुले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भिडेवाडा हा सावित्रीबाई फुले यांच्या कष्टाचा व समाजाच्या त्रासाला झुगारून आपले शिक्षण कार्य सुरू ठेवण्याचा साक्षीदार आहे. हा वाडा स्त्राr शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. परंतु अनेक वर्षांपासून या वाडय़ाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. हा वाडा आता जमीनदोस्त होण्याच्या स्थितीत आहे. म्हणूनच शासनाने भिडे वाडय़ाला राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावे व तेथे यथोचित स्मारक बांधण्यात यावे. तसेच या ठिकाणी पुन्हा गरीब मुला-मुलींसाठी शाळा सुरू करण्यात यावी. हा वाडा जमीनोदस्त होण्याआधी शासनाने योग्य ती पावले उचलून या वाडय़ाचे संवर्धन करावे, अशी अपेक्षाही यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

 

Related posts: