|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दोडामार्गला अवजड वाहतूक पुन्हा रोखली

दोडामार्गला अवजड वाहतूक पुन्हा रोखली 

वार्ताहर / दोडामार्ग:

दोडामार्ग शहरात वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार वाढीस लागल्याने दोडामार्गातील व्यापारी, नागरिक, सर्वपक्षिय पदाधिकारी यांनी आज बुधवारी पुन्हा एकदा शहरात प्रवेश करू पाहणारी अवजड वाहने ग्रामीण रुग्णालय येथे रोखून धरली. जो पर्यंत बेकायदेशीर सुरू असलेल्या वाहतुकीवर कारवाई होत नाही, तोपर्यंत अवजड वाहतूक रोखून धरण्याचा निर्णय शहरवासीयांनी घेतला.

घटनास्थळी पोलीस दाखल होताच नागरिकांनी या वाहनांवर कारवाई करण्याचे सूचित केले. मात्र, हा विषय आर. टी. ओ. विभागाचा असल्याचे सांगत कारवाई करण्यास पोलिसांनी नकार दर्शविला. कारवाई होईपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा शहरवासीयांनी घेतला. यावेळी दोडामार्ग उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजप शहराध्यक्ष योगेश महाले, स्वाभिमान शहराध्यक्ष दादा बोर्डेकर, कॉंग्रेस शहराध्यक्ष संदेश बोर्डेकर, समीर रेडकर, लक्ष्मण कवठणकर, रंगनाथ गवस, नीलेश रेडकर, विशाल चव्हाण आदींसह नागरिक उपस्थित होते.

Related posts: