|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » Top News » शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला सुरुवात

शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला सुरुवात 

ऑनलाईन टीम / रायगड :

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने आज रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे. शिवराज्याभिषेक सोहळयासाठी राज्यभरातून शिवप्रेमींनी मोठया प्रमाणावर गर्दी गेली आहे. आज 345 वा शिवराज्याभिषेक दिन आहे.

कालपासून सायंकाळपासूनच शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने विविध कार्यकमांना सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते गडपूजन झाले. त्यानंतर शिवकालीन युद्धकलेचा कार्यक्रम झाला. शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांमध्ये तलवार, भाला, जांबिया, माडू, फरी-गदगा यांचे सादरीकरण झाले. शिवभक्तांनी रायगडावर स्वच्छता मोहीमही राबवली. रायगडावर बुधवारी झालेल्या कार्यक्रमांना संभाजीराजेंसमवेत पोलंड व चीन येथील प्रतिनीधी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. बा रायगड परिवाराच्या वतीने 310 शिवसैनिक आणि नामाचे मानकरी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

Related posts: