|Saturday, March 28, 2020
You are here: Home » leadingnews » आरबीआय घटविणार व्याजदर?

आरबीआय घटविणार व्याजदर? 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज व्याजदराबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्मयता वर्तविण्यात आली आहे. 3 जूनपासून आरबीआयच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत 0.35 टक्क्मयांपर्यंत व्याजदर कमी होण्याची शक्मयता आहे.

देशाची आर्थिक वृद्धी होण्यासाठी व्याजदर घटवणे गरजेचे आहे. व्याजदर घटवल्यानंतर आरबीआयकडून कोणत्याही इतर बँकेने कर्ज घेतल्यास त्यांना नव्या व्याजदरानुसार कर्ज मिळणार आहे. बँकेला कमी व्याजदरात कर्ज मिळाल्यास त्याचा फायदा बँक ग्राहकाला देणार आहे. त्यामुळे सामान्यांनाही कर्ज घेणे स्वस्त होणार आहे.

अमेरिकेच्या रिसर्च फर्म बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचच्या रिपोर्टनुसार, महागाई सध्या योग्य स्तरावर आहे. त्यामुळे केंद्रीय बँक व्याजदर घटवून आणखी कमी करू शकते. मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानं राजकोष आणि चलनाच्या वृद्धीची जोखीम कमी झाली आहे. त्यामुळे व्याजदरात 0.25 टक्क्मयांची कपात होऊ शकते.

Related posts: