|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Top News » निपाह विषाणूचा महाराष्ट्राला धोका नाही

निपाह विषाणूचा महाराष्ट्राला धोका नाही 

ऑनलाईन टीम / मुंबई :

निपाह विषाणूचा महाराष्ट्राला कोणताही धोका नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. मागील वर्षी या विषाणूने केरळमध्ये थैमान घातला होता. त्यानंतर यंदाही तिथे निपाहचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर संपुर्ण देशाने निपाहचा धसका घेतला होता.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने राज्यभरात त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आली आहे. सध्या तरी या विषाणूचा कोणताही धोका महाराष्ट्राला नाही. रुग्णालये, डॉक्टर तसेच परिचारिका यांनी या आजारासंदर्भात घ्यावयाची काळजी आणि करायच्या उपाययोजना यासंदर्भातील मार्गदर्शिका राज्यातील सर्व रुग्णालयांना पाठविण्यात येत आहे.

या आजारात ताप, मेंदूज्वर, अंगदुखी, डोकेदुखी, झोप येणे, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात. हे विषाणू प्रामुख्याने केरळ, ईशान्य भारत, बांगलादेश, पश्चिम बंगाल परिसरात आढळले आहेत. या विषाणूसाठी कोणतीही लस नसल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. अशा रुग्णांनी तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.