|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे पोस्टर लाँच

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे पोस्टर लाँच 

ऑनलाईन टीम / पुणे :

हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य इतिहासाची महती सांगणाऱया ‘सरसेनापती हंबीरराव’ या मराठी चित्रपटाची घोषणा आज करण्यात आली.

उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचा अनावरण सोहळा कोंढणपूर पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्या किल्यावर रोवली अशा तोरणा आणि स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड या किल्यावरुन हेलीकॉप्टरने चित्रपटाचे पोस्टर आकाशात लाँच करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती होण्याचा बहुमान हंबीरराव मोहिते यांनी मिळवला.

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या सोहळय़ाला, चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, निर्माते संदीप रघुनाथराव मोहिते पाटील, धर्मेंद्र सुभाष बोरा आदी उपस्थित होते.