|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Automobiles » ‘सहारा’ची इलेक्ट्रीक कार लवकर बाजारात

‘सहारा’ची इलेक्ट्रीक कार लवकर बाजारात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सहारा इंडिया कंपनी आता ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रवेश करत आहे. ‘सहारा इव्होल्स’ या ब्रँडच्या नावाखाली सहारा लवकरच आपली इलेक्ट्रीक कार बाजारात आणणार आहे. ‘सहारा इंडिया’चे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांनी ही माहिती दिली आहे.

सहारा कंपनी इलेक्ट्रीक कारसह दोन व तीन चाकी इलेक्ट्रीक वाहनाचेही उत्पादन करणार आहे. या इलेक्ट्रीक गाडय़ा चार्ज करण्यासाठी चार्जिंग सेंटर्सचे मोठे जाळे निर्माण करण्याचाही सहाराचा विचार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत सहारा ऑटोमोबाईल बाजारात आपला जम बसविणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी इलेक्ट्रीक गाडय़ा गरजेच्या आहेत. त्यांच्यामुळे देशावरील इंधन आयातीचा भार हलका होईल, असा विश्वास सुब्रतो रॉय यांनी व्यक्त केला आहे.