|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वरूणराजाच्या हजेरीने शैक्षणिक वर्षाला प्रारंभ

वरूणराजाच्या हजेरीने शैक्षणिक वर्षाला प्रारंभ 

म्हापसा  :

बार्देशात पावसाच्या हजेरीने शाळांची सुरवात झाली. अचानक ऐनवेळी शाळेला जायच्यावेळी पावसाने हजेरी लावल्याने मुलांचा गोंधळ उडाला. काही मुलांनी अद्याप छत्री, रेनकोट खरेदी केले नव्हते. ती मुले भरपावसात कशीबशी शाळेत येताना पाहायला मिळाली. राज्यातील सर्व शाळांचे शैक्षणिक वर्ष हे ठरल्यानुसार 6 जून रोजी सुरू झाले. शाळेच्या पहिल्या दिवशीच पहाटेच वरूणराजाने हजेरी लावल्याने बालगोपाळांनी पावसाचा आनंद लुटला.

सुमारे दोन महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर ठरल्यानुसार गुरुवार दि. 6 जून पासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. वरूणराजाने अद्याप राज्यात हजेरी न लावल्याने व उकाडय़ामुळे शाळा पुढे ढकलण्यात येतील अशा आशयाचा संदेश वॉट्सऍपद्वारे सर्वत्र जाताना पाहायला मिळाला. मात्र शिक्षण संचालकांनी शैक्षणिक वर्षात सुरुव ातीला कोणताही बदल न होता शाळा ठरल्यानुसारच सुरू होणार असल्याचे स्पष्ट केल्याने अखेर या वादावर पडदा पडला. यंदाच्या वर्षी राज्यात मंडळाचा निकाल 92 टक्के लागला होता. त्या जोमानेच पुढील वर्षीही विद्यार्थी मोठय़ा उत्साहाने पास होणार, आताचे विद्यार्थी खूप हुशार आहेत अशी प्रतिक्रिया पालक आनंद पांढरे यांनी बोलताना व्यक्त केली.

म्हापसा बाजारपेठेत मुलांना आपल्या पालकासमवेत नवीन दप्तर, नवा गणवेश, नवी पुस्तके, वह्या, चप्पले आदी साहीत्य खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली. पहाटेच पाऊस पडल्याने काही ठिकाणी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाल्याचे आढळून आले त्यामुळे काही हायस्कूलमध्ये विद्यार्थी पाच ते दहा मिनीटे उशीराने पोचले. बऱयाच हायस्कूलचा निकाल 100 टक्केहून लागल्याने आपापल्या विद्यालयाचा दर्जा वाढविण्यासाठी व विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याचे बार्देशात अनेक विद्यालयात नववीच्या वर्गांत विद्यार्थ्यांना पुढे न ढकलता नापास केल्याची माहिती सुत्रांनी बोलताना दिली.

Related posts: