|Monday, February 24, 2020
You are here: Home » Top News » पतीच्या एक तृतीयांश पगारावर पत्नीचा हक्क

पतीच्या एक तृतीयांश पगारावर पत्नीचा हक्क 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पतीच्या एक तृतीयांश पगारावर पत्नीचा अधिकार असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. एका महिला याचिकाकर्त्याच्या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने पतीच्या पगारातील 30 टक्के हिस्सा पत्नीला मिळालाच पाहिजे, असे म्हटले आहे.

संबधित याचिकाकर्त्या महिलेचे लग्न 7 मे 2006 झाले होते. त्यानंतर काही कारणास्तव ते वेगळे राहू लागले. या महिलेचा पती सीआयएसएफमध्ये इन्स्पेक्टर आहे. घटस्फोटानंतर महिलेने पोटगीसाठी न्यायालयात अर्ज केला. या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होऊन 21 फेब्रुवारी 2008 रोजी पत्नीला पोटगी ठरवण्यात आली. त्याअंतर्गत पतीच्या पगाराचा 30 टक्के हिस्सा पत्नीला देण्याचे ठरले.

मात्र, पतीला 30 टक्के पोटगीचा निर्णय मान्य नव्हता. कोर्टाच्या या निर्णयाला महिलेच्या पतीने आव्हान दिले. त्यानंतर तो भत्ता 30 टक्क्मयांवरून 15 टक्क्मयांवर आणण्यात आला. महिलेला 15 टक्क्यांचा निर्णय मान्य नव्हता. तिने या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर दिल्ली न्यायालयाने पुन्हा एकदा पत्नीला 30 टक्के पोटगी देण्याचा निर्णय दिला.

Related posts: