|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Top News » भारतविरोधी सामन्यात केवळ खेळावरच लक्ष द्यावे : इम्रान खान

भारतविरोधी सामन्यात केवळ खेळावरच लक्ष द्यावे : इम्रान खान 

ऑनलाईन टीम / लंडन :

आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील बहुप्रतीक्षित भारत-पाकिस्तान सामना येत्या 16 जून रोजी होत आहे. या सामन्यापूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या खेळाडूंना भारताविरुद्ध खेळताना केवळ खेळावरच लक्ष केंद्रित करा, अशा सूचना केल्या आहेत.

क्रिकेट सामन्यात भारताचे गडी बाद झाल्यानंतर वेगळय़ा प्रकारचा आनंद व्यक्त करण्याची परवानगी मागणारा प्रस्ताव पाक संघाने इम्रान खान यांना पाठवला होता. त्यावर इम्रान यांनी पाकिस्तानी खेळाडूंनी क्रिकेट सामना खेळताना फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना केल्या आहेत.

भारतीय क्रिकेट संघाने मार्च महिन्यात रांची येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पुलवामा शहिदांच्या स्मृतिप्रित्यर्थ लष्करी कॅप परिधान केली होती. हा भारताचा खेळाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न असू शकतो. यालाच कृतीतून उत्तर देण्याचा पाक संघाचा इरादा होता. मात्र, इम्रान यांनी खेळाव्यतिरिक्त इतर प़ृतींना विरोध दर्शविला आहे.