|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » शालिमार एक्स्प्रेसमधील जिलेटीन कांडय़ा एकतर्फी प्रेमातून

शालिमार एक्स्प्रेसमधील जिलेटीन कांडय़ा एकतर्फी प्रेमातून 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शालिमार एक्स्प्रेसमध्ये ठेवलेल्या जिलेटीन कांडय़ांप्रकरणी पोलिसांनी बुलढाणा येथून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याने एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केल्याची माहिती तपासाअंती समोर आली आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनसवर बुधवारी सकाळी दाखल झालेल्या शालिमार एक्स्प्रेसमध्ये सफाई कर्मचाऱयांना या जिलेटिनच्या कांडय़ा आढळल्या होत्या. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, रेल्वे पोलीस दलासह बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक आणि दहशतवादविरोधी पथकाने या प्रकरणाची दखल घेतली.

तपासादरम्यान, जिलेटिनसोबत एक पत्र आणि एका व्यक्तीचे छायाचित्रही घटनास्थळी आढळून आले होते. या पत्रामध्ये भाजप सरकारला धमकवण्यात आले होते. टिळक नगर पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन करून मुंबईबाहेरून एकाला ताब्यात घेतले. त्या तरुणाचे एका तरुणीशी एकतर्फी प्रेम होते. संबंधित तरुणीच्या पतीला या प्रकरणात गोवण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे.