|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Top News » ‘बलिदान बॅज’ प्रकरणी धोनीला बीसीसीआयचा पाठिंबा

‘बलिदान बॅज’ प्रकरणी धोनीला बीसीसीआयचा पाठिंबा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

महेंद्रसिंह धोनीने घातलेल्या ग्लोव्हजवरील पॅरा कमांडोजच्या बलिदान बॅजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आक्षेप घेतला आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामन मंडळाने (बीसीसीआय) धोनीला हा बॅज काढण्याची गरज नाही. आम्ही आमच्या खेळाडूंच्या मागे ठामपणे उभे असल्याचे बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी म्हटले आहे.

धोनीच्या ग्लोव्हजवरील बॅज काढण्यासाठी आयसीसीने बीसीसीआयला सांगितले होते. मात्र, बीसीसीआयने धोनीला पाठिंबा दर्शविला आहे. धोनीच्या ग्लोव्हजवरील मानचिन्ह हे कोणत्याही धर्माचे प्रतिक नाही, तसेच ते व्यावसायिक स्वरूपाचे देखील नाही. मात्र, आम्ही ग्लोव्हजवरील चिन्हांसाठी आयसीसीकडे परवानगी मागणार आहोत, असेही राय यांनी स्पष्ट केले. या प्रकरणावर बीसीसीआयच्या मुख्यालयात आज दुपारी बैठक होणार आहे. क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांसह भारतीय क्रिकेटप्रेमींनी धोनीला समर्थन दिले आहे.