|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » जलसंधारणामुळे उत्पादकता वाढली : देवेंद्र फडणवीस

जलसंधारणामुळे उत्पादकता वाढली : देवेंद्र फडणवीस 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यातील जलसंधारणाच्या कामांमुळेच कमी पावसात देखील शेतीची उत्पादकता वाढली आहे. यंदाही पाऊस चांगला होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे. मात्र, शेतकऱयांनी पेरण्या जरा उशीरा कराव्यात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुंबईतील खरिपाच्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, राज्यात यंदा पाऊस चांगला होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, शेतकऱयांनी पेरण्या थोडय़ा उशीराच कराव्यात. त्यासंदभार्त प्रसारमाध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. तसेच मागील वर्षी प्रमाणे यंदाही पाच कोटी शेतकऱयांना ऍडव्हायजरी मेसेजेस पाठविण्यात आले आहेत.

राज्यातील 55 ते 60 टक्के क्षेत्रात हे कापूस आणि सोयाबीन घेतले जाते. कमी पावसात देखील मागील वर्षी कापूस आणि सोयाबीन उत्पादनात 17 टक्के वाढ झाली आहे. तर 10 टक्के क्षेत्रात भात, 11 टक्के क्षेत्रात मका तर 8 टक्के क्षेत्रात ऊसाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे शेतीचे पावसानुसार नियोजन करण्यात यावे, असेही फडणीस म्हणाले.