|Friday, February 28, 2020
You are here: Home » उद्योग » कार-दुचाकीचा थर्ड पार्टी विमा 16 पासून महागणार

कार-दुचाकीचा थर्ड पार्टी विमा 16 पासून महागणार 

12 ते 21 टक्क्यांची वाढ : शालेय बस, मालवाहूसह सार्वजनिक वाहनांचाही समावेश

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) वाहनांच्या काही श्रेणींतील थर्ड पार्टी मोटार विमा हप्त्यात 12 ते 21 टक्क्मयांची वाढ केली आहे. त्यामुळे 16 जूनपासून कार आणि दुचाकी वाहनांचा विमा महागणार आहे.

थर्ड पार्टी विमा हप्त्याच्या दरामध्ये सर्वसाधारणतः एक एप्रिलपासून बदल करण्यात येतात. मात्र, 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचे नवे दर 16 जूनपासून लागू होणार आहेत. कमी क्षमतेच्या 1,000 सीसी पर्यंतच्या छोटय़ा कारसाठी थर्ड पार्टी विमा हप्त्यात 12 टक्के वाढ झाल्याने विमा हप्ता 1,850 वरून 2,072 रुपये होणार आहे. त्याचप्रमाणे 1 हजार आणि दीड हजार सीसीच्या वाहनांसाठी विमा हप्त्यात 12.5 टक्के वाढविल्याने 3,221 रुपये झाला आहे.

दीड हजार सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या कारसाठी थर्ड पार्टी विमा हप्ता वाढलेला नाही. तो 7,890 रुपये असाच ठेवण्यात आला आहे. 75 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी वाहनांचा थर्ड पार्टी विमा हप्त्यात 12.88 टक्क्मयांनी वाढवल्याने हा 482 झाला आहे. तर 75 ते 150 सीसी दुचाकी वाहनांसाठी विमा हप्ता 752 रुपये करण्यात आला आहे.

ई-रिक्षांच्या विमा हप्त्यात बदल नाही

150 ते 350 सीसी क्षमतेच्या दुचाकींसाठी विमा हप्त्यात सर्वाधिक 21.11 टक्के वाढ केल्याने विम्यासाठी 1,193 रुपये मोजावे लागतील. 355 सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या दुचाकींसाठी विमा हप्त्यात बदल झालेला नाही. मालवाहू खाजगी आणि सार्वजनिक वाहनांसाठीही थर्ड पार्टी विमा हप्त्यांत वाढ झाली आहे. ई-रिक्षासाठी मात्र विमा हप्त्यात कोणताही बदल झालेला नाही. शालेय बससाठी थर्ड पार्टी विमा हप्त्यात वाढ झाली आहे.

 

Related posts: